अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी एनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे.
ड्रग्स रॅकेट प्रकरणीएनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीकडून समीर खान यांची सुमारे दहा तासांपासून चौकशी सुरू होती.
दरम्यान, सुमारे दहा तास चाललेल्या चौकशीनंतर समीर खान यांना अटक करण्यात आली, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली.
ड्रग्स पेडलर करण सजनानी याच्या चौकशीमधून समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved