राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- इंजिनिअर मारहाण प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे.

फेसबुकवर जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आव्हाड यांच्यासह मारहाण करणार्‍यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

त्यानुसार पोलिसांनी काही जणांवर कारवाई करून अटक केली असली तरी आव्हाड यांच्या विरोधात कारवाई न केल्याने अनंत करमुसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. 

 या याचिकेवर सुनावणी झाली. तक्रारदाराने केलेल्या मागणीनुसार ज्या रात्री तरुणाला मारहाण झाली त्या प्रकरणातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ठाणे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत.

ठाण्यात ५ एप्रिलला अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनिअर तरुणाला मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समक्ष त्यांच्या अंगरक्षकांनी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती, अशी तक्रार त्यांनी दाखल केली होती.

आव्हाड यांच्या बंगल्यावर गेल्यानंतर काही लोकांनी कुरमुसेला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हेदेखील उपस्थित होते असा दावा कुरमुसेने केला आहे. त्यानंतर कुरमुसेला त्याने केलेली ती पोस्ट डिलिट करायला लावली. त्यानंतर माफीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती कुरमुसेने दिली. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment