राष्ट्रवादीकडून छावणीचे बिल देण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

नगर :- शासनाने चारा छावणी चालू ठेवण्याबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी छावणी चालकांचे बाकी असलेले बिल दोन ते तीन दिवसांत अदा करण्यात यावे,

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

या वेळी नगर श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दादा दरेकर, छावणीचालक रवींद्र शेळके, हर्षवर्धन शेळके, राजेंद्र शेळके, अशोक शिंदे, बाबासाहेब चितळकर, जयसिंग निमसे, रावसाहेब चितळकर, भीमा शिंदे, तात्या वाघमोडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment