निष्काळजीपणा जीवावर बेतला : ज्याने कोरोनाची पहिली लस घेतली त्याचाच कोरोनामुळे मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. देशातील आठ राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहेत.

देशातील एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण या राज्यांतून आहेत. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही वाढला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे,

याबाबत सविस्तर वृत्त असे कि व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असलेले पवार हे व्हॅक्सिनेशनच्या ट्रायलमध्ये सहभागी झाले होते.

५५ वर्षाचे पवार यांना मधुमेह होता त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर लसीकरणाचा काय प्रभाव होतो हे पाहण्यासाठी त्यांना ट्रायल मोहिमेत सहभागी केले होते. पवार याच्या कुटुंबियांच्या मते ते कोव्हीड लस घेणारे नागपुरातले पहिले व्यक्ती होते.

मार्च महिन्यात त्यांनी मार्च महिन्यात त्यांनी लसीचा दुसरा डोज घेतला. लसीकरण झाल्याने आपल्याला कोरोना होणे शक्य नाही असे त्यांना वाटले आणि त्यांचा हा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतला.

पवार यांना कोरोनाचे लक्षणे असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. खोकला आणि कफचा त्रास वाढल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली, ती पॉसिटीव्ह आली.

त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर लावले गेले परंतु प्रतिकार शक्ती कमी झाल्याने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe