नेवासा :- बायकोने नकार दिल्याने नवर्याने रागाच्या भरात तिचे डोके फोडल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर असे कि,सलाबतपूर भागात राहणारी विवाहित महिला सौ. सुनिता शंकर गवळी, वय ३३ ही तरवडी, ता. नेवासा येथे असताना
तेथे पती शंकर भाऊराव गवळी, रा. सलाबतपूर, ता. नेवासा हा आला व तू माझ्यासोबत चल, असे बोलला. तेव्हा पत्नी सुनिता गवळी हिने पती शंकर गवळी सोबत जाण्यास नकार दिला.
त्याचा राग आल्याने नवरा शंकर भाऊराव गवळी याने लाकडी दांड्याने पत्नी सुनिता शंका गवळी यांचे डोके फोडून जखमी केले. साक्षीदारांनाही शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली व दमदाटी केली.
याप्रकरणी जखमी पत्नी सुनिता शंकर गवळी यांनी वरीलप्रमाणे नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा शंकर भाऊराव गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे