नेवासे :- तालुक्यात राजकीय वादातून ३० एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास नेवासे शहरात दोन गटांत मारामारी झाली. दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले.
तीन गाड्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांचे सात जण अटकेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, न्यायालयीन प्रक्रियेत स्टे मिळाल्यामुळे नगरसेवकांच्या एका गटाने वाजवलेल्या फटाक्यांमुळे दोन गटांत मारामारी झाली.
जमाव काबूत करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दोन्ही गटांकडून दगडफेक झाली. त्यामुळे शहरातील वातावरण तंग झाले होते.
याप्रकरणी पोलिस भारत घुगे यांनी फिर्याद दिली आहे. नाईकवाडीपुरा मोहल्ल्यात मुस्लिम समाजातील दोन कुटुंबांत वाद होऊन दगडफेक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अल्ताफ पठाण व मुक्तार शेख यांच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना शिवीगाळ करत दगड, विटा एक फेकून मारत होते. या प्रकारामुळे मोहल्ल्यात दहशत निर्माण होऊन लोक सैरावैरा पळत होते.
घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक डेरे व अन्य पोलिस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना रात्री सव्वादहाच्या सुमारास एक दगड घुगे यांच्या डाव्या पायाच्या मांडीला लागून ते जखमी झाले.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?