पाण्यासाठी नगर जिल्ह्यातील आमदार एकत्र का येत नाहीत?

Ahmednagarlive24
Published:

नेवासा :जिल्ह्यातील टेलच्या भागापर्यंत पाटपाणी पोहोचल्यानंतर जायकवाडीत पिण्यासाठी पाणी सोडण्यास आमचा विरोध नाही. पण पिण्याच्या नावाखाली दारू व साखर कारखान्यांना पाणी देण्यास आमचा विरोध आहे.

पाण्यासाठी मराठवाड्यातले आमदार एकत्र येतात, नगर जिल्ह्यातले का येत नाहीत अशी खंत व्यक्त करतानाच बेलापूर-परळी रेल्वेमार्गास युतीच्याच काळात गती मिळाली, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वेप्रवासी संस्थेच्या वतीने रविवारी खासदार लोखंडे व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा कुकाणे येथील विठ्ठल मंदिर प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार लोखंडे बोलत होते.

समितीचे रितेश भंडारी यांनी प्रास्तविक केले. खासदार लोखंडे म्हणाले, ब्रिटीशकालीन हा रेल्वेमार्ग केवळ पाठपुरावा नसल्याने रेंगाळला होता. मी व मुरकुटे यांनी त्यास चालना दिली. येथून पुढे पाण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करावा लागणार आहे.

आमदार मुरकुटे म्हणाले, या रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. या दूरदृष्टीच्या निर्णयामागे नेवासे तालुक्याचे विकासात्मक उज्ज्वल भवितव्य दडलेले आहे. रेल्वेमार्गासाठी खासदार प्रीतम मुंडेही सहकार्य करणार आहेत. शहापूर-गेवराई हा राष्ट्रीय मार्गही या भागाच्या विकासाला मोठा हातभार लावणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment