परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार

Ahmednagarlive24
Published:

मुंबई,दि.  ३० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात अडकलेले विशेषतः आंध्रप्रदेश, तेलंगणात अडकलेले मजूर तसेच राज्यातील विद्यार्थी यांना स्वगृही आणण्यात यावे, 

अशी वारंवार मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य  सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे केली होती.

तसेच आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांना केंद्र शासनास पत्र द्यावयास सांगितले होते. श्री. वडेट्टीवार यांनी या  मागणीचा सतत पाठपुरावा केल्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर,  विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

याबाबत  इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना स्वगृही परतण्याच्या प्रवासाला परवानगी देऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा, दिल्ली, पुणे, मुंबई यांसह राज्यातील इतर जिल्ह्यात  महाराष्ट्रातील  मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी तिथे वास्तव्य करीत आहेत.

लॉकडाऊनमुळे ही मुले गेल्या दोन महिन्यापासून तेथेच अडकून पडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून परराज्यात  शिकणारे विद्यार्थी महाराष्ट्रात परत कसे येतील याबाबत शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती श्री.वडेट्टीवार यांनी केली होती .

कोविड – १९ या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू  करण्यात आली. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजार अठ्ठावन्न , तेलंगणा राज्यात २ हजार सहाशे त्रेचाळीस आंध्रप्रदेश राज्यातील व गडचिरोली जिल्ह्यातील अंदाजे दहा हजार तर  तेलंगणा राज्यातील दोन हजार मजूर आंध्रप्रदेश राज्यात  मागील चार  महिन्यापासून अडकले आहेत.

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून या मजुरांअभावी जिल्ह्यातील कामे खोळंबली जाऊ शकतात. त्यामुळे या मजुरांना  तात्काळ स्वगावी  आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी  मागणी श्री. विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

परराज्यात अडकलेल्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना पुन्हा महाराष्ट्रात स्वगावी आणण्यात यावे या मागणीचा पाठपुरावा  वडेट्टीवार वारंवार करीत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केंद्र सरकारला पत्र देऊन सतत पाठपुरावा केला होता.  श्री. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थ्यांचा घरवापसीचा मार्ग मोकळा झाला असून

या सर्वांना आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत असून वडेट्टीवार यांनी संबधित विभागांशी चर्चा करीत आहेत. श्री. वडेट्टीवार यांच्या प्रयत्न यशस्वी झाल्याने मजूर आणि विद्यार्थ्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment