श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने उमेदवारीबाबतच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला. पाचपुते यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखत आहे.
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. शेलार यांच्या रूपाने भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात भाजपने पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात भक्कम उमेदवार देण्यासाठी नागवडे-जगताप यांची एकजूट करून मंत्री विखे यांचे कट्टर समर्थक व ओबीसी नेते अण्णासाहेब शेलार यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलावण्यात आले.
नागवडे उमेदवारीसाठी आग्रही होते, पण त्यांची भक्ती कमळाबाईवरच होती. अन्यथा निवडणूक न लढवण्याचे संकेत त्यांनी दिले होते. आमदार राहुल जगताप यांनीही भाजप, शिवसेनेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी न झाल्याने परत राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर ते आळवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, मनोहर पोटे व घनश्याम शेलार यांचीही चाचपणी करत आहे. खासदार विखे कट्टर समर्थक व मागील विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना खंबीर साथ देणारे अण्णासाहेब शेलार हे पाचपुते यांच्या विरोधात बंडखोरी करतील का? हे येत्या काही तासांतच समजेल.
- प्रोजेक्ट विष्णूने शत्रू देशात खळबळ! भारत एकाचवेळी बनवणार 12 हायपरसोनिक मिसाईल्स; तब्बल 2,000 किमी रेंजने करणार शत्रूवर मारा
- नेटवर्कशिवाय कॉलिंग? Tecno चा भन्नाट फीचर्सवाला स्मार्टफोन उद्या होतोय लाँच! ड्युअल सिम, डॉल्बी अॅटमॉस आणि तब्बल 6000mAh बॅटरी मिळणार
- आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, UPI नेच जमा करता येईल पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!
- IBPS PO Jobs 2025: IBPS अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाची मेगा भरती सुरू; तब्बल 5208 जागांसाठी भरती सुरू
- मशरूम शाकाहारी आहे की मांसाहारी?, खरं उत्तर ऐकून धक्का बसेल!