रोहित पवार म्हणतात राम शिंदेंविरोधात लढत नाही, तर…

Published on -

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या 77 जणांच्या पहिल्या यादीत रोहित पवार यांचं नाव आहे. भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार मैदानात उतरले आहेत

कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेऊन रोहित पवार अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अक्काबाई मंदीरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार  आहे. त्यानंतर सभा होणार आहे.

शरद पवार यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. स्वत:वर विश्वास ठेव, लोकांवर विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत कष्ट घे, असे त्यांचे शब्द होते, असे रोहित पवारांनी सांगितलं.

मी सतत हेच सांगतोय की माझी लढत राम शिंदेंविरोधात नाही, तर माझी लढत अशा विचाराविरोधात आहे, जो विचार सर्वसामान्यांना विश्वासात घेतलं नाही.

इथल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवलं. त्याविचाराविरोधात मी लढत आहे. पुढचा व्यक्ती किती तगडा असला, तरी आपण किती कष्ट घेतो, लोकांचा किती विश्वास संपादन करतो ते महत्त्वाचं आहे, असं रोहित यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe