अहमदनगर :- वयाच्या 26 व्या वर्षी सर्वात तरुण आमदार म्हणून विधानसभेत गेलेले राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहूल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपाचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती बदलली, श्रीगोदा तालुक्यातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत आमदार जगताप यांनी माघार घेत कार्यकर्त्यांना दुसरा धक्का दिला.
श्रीगोंद्यात आज आ.राहुल जगताप यांच्यासह बाबासाहेब भोस, अण्णा शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यात बैठक झाली.या बैठकीत घन:श्याम शेलार यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, यावर एकमत झाले.
नागवडे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर …
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती यांचा काल होणारा भाजप प्रवेश पडद्याआडच्या हालचालीमुळे लांबणीवर पडला.
राजेंद्र नागवडे यांचा काल भाजपमध्ये जवळपास प्रवेश निश्चित होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही त्यासाठी अनुकूल होते. मात्र, अचानक अशा काही घडामोडी घडल्या की त्यामुळे राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे या दोघांचाही होणारा प्रवेश लांबला.
- साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती
- Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर