श्रीगोंदा :- तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघात घेतल्यानंतर समर्थक, कार्यकर्त्यांची माफी मागीतली आहे. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकली आहे.
भाजपाचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच, मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले. त्याआधी खुद्द आ.जगताप यांच्यासह राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडू भाजपाच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती.

मात्र आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून लढण्याऐवजी उमेदवारी नको, म्हणून स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
आ.राहुल जगताप मैदानातून बाहेर पडल्याचे गुरूवारी स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी फेसबुक पोस्टद्वारे समर्थकांची माफी मागीतली आहे. ‘मी आपली मनापासून माफी मागतो. माझ्याकडून आपल्या अपेक्षा होत्या.
त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आदरणीय बापू (स्व.शिवाजीराव नागवडग) व तात्या (स्व.कुंडलीकराव जगताप) यांचे विचार सदैव सोबत घेवून या पुढेही कायम आपल सोबत राहील. पुढचा काळ आपलाच आहे. ज्येष्ठ मंडळींनी आशिर्वादाचा पाठीवरचा हात कायम ठेवावा. तरूणांनी या मित्राला अशीच मदत करावी’ असे त्यांनी म्हटले आहे.
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…
- iQOO Neo 10R लाँच होण्याआधीच लीक ! 6400mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि दमदार कॅमेरासह येणार
- Tata Motors शेअर्समध्ये सतत घसरण, Motilal Oswal यांनी सांगितलं कारण
- EPFO Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, ठेवींवर मिळणार इतके व्याज