तब्बल ३५०० कोटींची संपत्ती जप्त !

Published on -

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पिता-पुत्राला अटक केली. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत.

पीएमसी बँकेचे कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण ४४ मोठ्या खात्यांपैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित १० खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवान यांचे, तर दुसरे राकेश वाधवान यांचे खासगी खाते आहे. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते.

मात्र तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या जवळपास ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News