अकोल्याच्या विकासासाठीच पक्षांतर केले – आ. वैभव पिचड

Ahmednagarlive24
Published:

अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे.

भाजप, शिवसेना, रा.स.प., रिपाइं या महायुतीच्या वतीने भाजपने वैभवराव पिचड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल गुरुवारी पिचड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत पिचड बोलत होते.

आ. पिचड म्हणाले, राज्य बदलतयं, देश बदलतोय, आपणही बदलावे आणि विकासाच्या या उत्सवात सामील व्हावे, यासाठीच आपण भाजपत प्रवेश केल्याचा पुरुच्चार त्यांनी केला. अकोल्याच्या विकासासाठीच आपण पक्षांतर केले असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment