शक्तिप्रदर्शन करीत आ.शिवाजी कर्डिलेंचा अर्ज दाखल

Ahmednagarlive24
Published:

राहुरी  : काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाराचे बारा आमदार युतीचेच निवडून येतील याबाबत कोणत्याही प्रकारची शंका नाही. आमदार शिवाजीराव कर्डिले हे मला लोकसभेत मिळालेल्या मताधिक्यपेक्षाही जास्त मतांनी निवडून येतील आणि आम्ही दोघे मिळून या मतदारसंघाचा आणखी कायापालट करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

येत्या दोन वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल, असे भाकीत देखील केले आहे.राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील विधानसभेसाठीचे भाजप-शिवसेना व महायुतीचे उमेदवार आ. कर्डिले यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत खा. डॉ. विखे पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, संचालक सुरसिंग पवार, विजयराव डौले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment