अहमदनगर : शहर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ९ कोटी ३३ लाख ५७ हजार ४५७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शीतल कोट्याधीश आहे.
जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी संपत्तीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ७ कोटी ११ लाख २० हजार ६३९ रुपयांची स्थावर व २ कोटी २२ लाख ३६ हजार ८१६ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

संग्राम यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले असून आपल्यावर गुन्हेगारी खटले प्रलंबित नसल्याचेही त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. जगताप यांच्याकडे हातावरील रोख रक्कम ३ लाख ५२ हजार ५२१ रुपये आहे. त्यांच्याकडे १० तोळे, पत्नीकडे ३० तोळे असे एकूण १५ लाख ७४ हजार ३३२ रुपयांचे दागिने आहेत.
चारचाकी दोन वाहने असून त्यांची किमंत ४९ लाख ३६ हजार ४६ रुपये आहे. नगर, श्रीगोंदा या ठिकाणी त्यांच्या नावावर जमीन आहे.त्यांच्यावर ३ कोटी ९२ हजार ५६१ रुपयांचे कर्ज आहे जगताप यांचा शेती व समाजसेवा हा व्यवसाय आहे.
- 84 वर्षांची ‘ही’ जुनी कंपनी एका शेअरवर 3 Bonus Share देणार ! रेकॉर्ड डेट कोणती? पहा…
- सॅमसंगचा 5G स्मार्टफोन फक्त 9 हजारात ! ‘या’ ठिकाणी मिळतोय बंपर डिस्काउंट
- मोटोरोलाचा फ्लिप फोन आता तुमच्या बजेटमध्ये! Motorola Razr 60 वर मिळतोय 15,000 रुपयांचा डिस्काउंट
- Mahindra XUV 3XO खरेदीसाठी 200000 डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- Tata Motors चा मोठा धमाका ! नव्यानेच लॉन्च झालेल्या SUV च्या किमतीत 1.80 लाखांची कपात, वाचा डिटेल्स