नगर, पुणे, मुंबई येथे मालमत्ता…अशी आहे अनिल राठोड यांची संपत्ती !

Published on -

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे ३ कोटी ५९ लाख ७० हजार १६७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

त्यांच्या पत्नी शशिकला यांच्याकडे ६३ लाख ७५ हजार ४८८ रुपयांची संपत्ती आहे. राठोड यांनी काल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे उमेदवारी अर्जासह संपत्ती विवरणाचे शपथपत्र सादर केले.

त्यानुसार त्यांच्याकडे १ कोटी २० लाख ६५ हजार १६७ रुपयांची जंगम व २ कोटी ३९ लाख ५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

राठोड यांच्याकडे गुंतवणूक व ठेवी ९९ लाख ८७ हजार १६६ रुपयांच्या आहेत. त्यांच्याकडे ८ तोळे सोने, पत्नीकडे १५ तोळे सोने असे एकूण ८ लाख ९७ हजाराचा ऐवज असून नगर, पुणे, मुंबई येथेही त्यांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ५३ लाख ९१ हजार ३७८ रुपयांचे कर्ज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe