संगमनेर : शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, उद्योजक साहेबराव नवले यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी शिवसैनिकांसह भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली उमेदवारी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व नागरिकांसाठी असून संगमनेरात परिवर्तन अटळ असल्याचे मत उमेदवार नवले यांनी या वेळी व्यक्त केले.
या वेळी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे राजेश चौधरी, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,
ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासाहेब केसेकर, शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे डॉ. भानुदास डेरे आदी उपस्थित होते.
- रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!
- मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा
- भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?
- फेंगशुईनुसार बनवा घरातील किचन, कायम बरसेल धन-सुखाची कृपा!
- सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?