अहमदनगर :- भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची नगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा होती. त्यासाठीची आवश्यक तयारीही त्यांनी केली होती. पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे दूत नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंना भेटून अर्ज न भरण्याची सूचना केली आणि वाकळेंची इच्छा ‘थंडावली’. त्यानंतर ‘पक्षादेशानुसार निवडणुकीत काम करणार’, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

नगरची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपकडे घेऊन पक्षाकडून येथे उमेदवारी करण्याची मनीषा वाकळे यांच्यासह माजी खासदार दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची होती.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी घरी येऊन त्यांची भेट घेतली व नगरमधून पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायचा नाही, असा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर काही वेळाने नगरचे नवे खासदार डॉ. सुजय विखे यांचे दूत म्हणून नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंची भेट घेतली व अर्ज भरू नका, असा डॉ. विखेंचा निरोप असल्याचे स्पष्ट केले. या दोन सूचनांनंतर वाकळेंनी अर्ज दाखल करण्याचा विचार सोडून दिला.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













