अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती.
मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना येथील उमेदवारी द्यावी लागली.
तसेच आपल्या वाट्याच्या तिसऱ्या शिर्डीच्या जागेवर स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा थोरातांच्या जोर्वे गावातील व कट्टर थोरात समर्थक असलेल्या सुरेश थोरातांना उमेदवारी देण्यात आली.
स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्ता ऐनवेळी विखेंना ‘मॅनेज’ होईल, या भीतीपोटी काँग्रेसने सुरक्षेचा उपाय म्हणून थोरातांच्या गावच्याच थोरातांना उतरविण्याची खेळी करावी लागली असल्याचे बोलले जात असले तरी स्थानिक स्तरावर पक्षाशी एकनिष्ठ असलेला कोणी सापडला नाही, हेही यातून स्पष्ट झाले.
- जळगावात सैराट ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तीन वर्षांनंतर घेतला जावयाचा बदला
- मानहानीप्रकरणी राहुल गांधींना तूर्तास दिलासा
- अबुधाबी सर्वात सुरक्षित शहर,यादीत महाराष्ट्रातील ३ शहरे ! ३८२ शहरांच्या जागतिक क्रमवारीत १९ भारतीय शहरांना स्थान
- Jio Finance Share Price : मुकेश अंबानी यांच्या कंपनीचे शेअर घ्या आणि श्रीमंत व्हा !
- खासदार निलेश लंकेंच्या तालुक्यात येणार श्रीलंकेचा मुथय्या ! एमआयडीसीत साकारणार सर्वात मोठा प्रकल्प