अकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला.
कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांना पाठिंबा जाहीर केला.

‘विधानसभेची ही निवडणूक भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या दिशेने तालुक्याला घेऊन जाणारी ठरेल. ‘एकास एक’ या जनभावनेस जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वासही या वेळी डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला.
माकपच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणाची समीकरणे नक्कीच बदलतील. संधीसाधू आणि उथळ राजकारणाचा पाडाव होईल, व तत्वाधिष्टीत राजकारणाला बळकटी मिळेल असा विश्वास माकपचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे यांनी व्यक्त केला.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













