आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन – छिंदम

Ahmednagarlive24
Published:

‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली.

‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या घरात दोन आमदारकी असून त्यांच्या आमदारनिधीशिवाय अन्य निधी त्यांना आणता आला नाही’, असे स्पष्ट करून छिंदम म्हणाले, ‘मी भाजपचा उपमहापौर केवळ १ वर्षभर असताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून १० कोटींचा विकास निधी आणला होता. यावरून आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन’, हेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment