राहुरी – शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त गेले, तर भाजप सरकार महागाई वाढवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच देशात आर्थिक मंदी आली, असा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. राहुरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाडगेबाबा व्यापारी संकुल रस्त्यावर आयोजित सभेत पाटील बोलत होते.
ते म्हणाले, मागील निवडणुकीत राहुरीत दोन स्थानिक उमेदवार लढल्याने पराभवाची वेळ आली. मतदारसंघाला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन ताकद लावा. नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. लोक विचाराला महत्त्व देतात. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करावे. अमोल मिटकरी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बेरोजगारांना रोजगार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत नेमके काय केले. फडणवीस यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना हे चित्र मीडियात दाखवले जात नाही.

गोपीनाथ मुंडे असते, तर फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देणारे हे सरकार आहे. भाजपत निष्ठेला किंमत नाही, हे एकनाथ खडसे यांच्यावरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे अनेक गुन्हे दाखल असलेले उमेदवार, तर दुसरीकडे एकही गुन्हा दाखल नाही असे राष्ट्रवादीचे उमेदवार हे लक्षात घेऊन स्थानिक उमेदवार हवा की, पार्सल उमेदवार हवा हे ठरवा, असे आवाहन मिटकरी यांनी केले.
- आठव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता पण वाढणार का ? वाचा सविस्तर
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! रिटायरमेंटबाबत सरकारचे नवे आदेश, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का?
- महाराष्ट्रातील कोट्यावधी नागरिकांसाठी फडणवीस सरकारचा पुन्हा एक दमदार निर्णय ! आता ‘या’ लोकांना मिळणार 10 लाख रुपयांची मदत
- 12 तासांचा प्रवास आता 7 तासात होणार! महाराष्ट्रात धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! नव्या आठव्या वेतन आयोगात परफॉर्मन्स बेस्ड फॉर्म्युला लागू होणार? कसा असणार नवा फॉर्म्युला?













