अहमदनगर – विधानसभा निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झड़ लागल्या आहेत. उपनेते अनिल राठोड समर्थक माजी खासदार दिलीप गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शनिवारी राठोड यांनी भाजपाचे नेते वसंत लोढा याची भेट घेतली. ही माझी शेवटचीच निवडणक आहे, मला सहकार्य करा अशी भावनिक साद त्यांनी घातली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरडयांनी मध्यस्थी केली.

उपनेते राठोड यांना उमेदवारी मिळाल्यापासून शिवसैनिकांचा जोश वाढला आहे. तर शहरातील नेत्यांकडून शिवसेना सोडून गेलेल्यांची घरवापसी करुन घेतली जात आहे. अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड हे पक्षात सक्रीय झाले आहेत.
शनिवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या मध्यस्थीने राठोड यांनी वसंत लोढा यांची भेट घेतली. ही माझी शेवटचीच निवडणूक आहे, या निवडणुकीसाठी मला सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त केली.
वसंत लोढा यांनी उपनेते राठोड यांचे स्वागत करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. फक्त निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी सुचवू त्या प्राधान्याने लक्ष घालून मार्गी लावाव्यात.
सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. तुमचे काम करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, मंदार मुळे, संजय वल्लाकट्टी, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते.
- अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचं काय होणार ? प्रशासन, राजकीय नेते आणि लोकांच्या भावना…
- IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 750 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- पुण्यात तयार होत असलेल्या ‘या’ मेट्रोमार्गात मोठा बदल ! Metro Route मधील बदल पुणेकरांसाठी फायद्याचा की तोट्याचा ? पहा….
- Fortuner खरेदी करताय ? फक्त 5 लाखात घरी आणा फॉर्च्युनर ! 5 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा EMI ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून मिळणार एका लाखाचे व्याज ! गुंतवणूकदारांचे पैसे 3 वर्षात होणार डबल