सुजित झावरेंचे बंड थंडावणार ?

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :-  जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवत नगर जिल्हातील नेत्यांशी महाआघाडी करून विधानसभा निवडणुकीत उतरणाचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर राहुन पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना मदत करावी. अशी गळ राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी झावरे यांना घातली आहे.

दुसरीकडे झावरे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सोमवारी नगर जिल्हाच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी झावरे यांचे मन कळविण्यात यशस्वी होतात की नाही याकडेही लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीमध्ये झावरे यांचा स्थानिक पदाधिकान्यांसह पक्षश्रेष्ठींशी धुसफुस चालू आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत झावरे यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे यांच्याशी जवळीक साधत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला आहे. 

परंतु पारनेर नगर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने झावरे यांनी भाजपा प्रवेशाबाबत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. नगर तालुक्यातील महाआघाडीच्या कळपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या महाआघाडीमध्ये शिवसेनचे जि. प. सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य माधवराव लामखडे, माजी सभापती जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, सभापती रामदास भोर, जि. प. सदस्य प्रताप शेळके यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या महाआघाडीवतीने कार्ले व झावरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे दोन दिवसात या महाआघाडीचे उमेदवार पारनेर – नगर विधानसभा मतदार संघात ठरणार असून, कार्ले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे झावरे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठीं आशावादी असून मन वळविण्याचे प्रयत्न चालु केले आहेत.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment