पश्चिम बंगालमधील नाशिकच्या २०८ नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

नाशिक : कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पश्चिम बंगाल मध्ये १७ मार्च २०२० रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले एकूण २०८ नागरिक अडकले आहे.

या नागरिकांना पांडव, जि. मालदा येथून नाशिक येथे परतण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

तसेच यासंबंधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तेथील जिल्हाधिकारी राजश्री मित्रा यांना पत्रव्यवहार देखील केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील २०८ नागरिक १७ मार्च २०२० रोजी पश्चिम बंगाल मधील हजरत मखदूम आलम शेख अलालुलाहक लाहोरी पांडवी (रहा) यांचे पवित्र स्थान असलेल्या पांडव जि. मालाडा भेट देण्यासाठी गेले होते.

या धार्मिक कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक या ठिकाणी येत असतात. मात्र कोरोनाचे संकट आल्याने देशभरात लॉगडाऊन सुरु झाले.

त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांचे परतीचे रेल्वेचे तिकीट रद्द केले असून भाविक पांडव, जि. मालदा येथे अडकले आहेत. यामध्ये ९१ महिला, २९ मुले आणि ८८ पुरुषांचा समावेश आहे.

या सर्व नागरिकांना नाशिकमध्ये परतण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

तसेच छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार नुसार माजी खासदार समीर भुजबळ हे तेथील प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी येथील खासदारांशी देखील चर्चा केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment