आमदार मोनिका राजळे कोट्यधीश पण एकही चारचाकी वाहन नाही !

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव ; – आमदार मोनिका राजळे कोट्यधीश असून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी आपल्या कुटुंबाकडे नऊ कोटी 28 लाख 86 हजार 178 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.

प्रतिज्ञापत्रात त्यांनी दीड कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. आ. मोनिका राजळे यांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही, तर त्यांचे पती स्व. राजीव राजळे यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे. मोनिका राजळे यांची एकूण संपत्ती ही सहा कोट 20 लाख 384 रुपये आहे तर त्यांचे पती स्व. राजीव राजळे यांच्याकडे एक कोट 77 लाख 21 हजार रुपयांची संपत्ती आहे.

मोनिका राजळे यांची 66 लाख 17 हजार 798 रुपयांची जंगम मालमत्ता असून यामध्ये दागिने, शेअर्स याचा समावेश आहे तर स्व. राजीव राजळे यांच्या नावावर 65 लाख 46 हजार 996 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

मोनिका राजळे यांच्यावर एक कोटी 29 लाख 22 हजार रुपयांचे कर्ज असून स्व. राजीव राजळे यांच्यावर 21 लाख 61 हजार 472 रुपयांचे कर्ज आहे. राजळे यांचा आस्ट्रेलियात शिक्षण घेत असलेला मुलगा कृष्णा राजळे यांच्यासाठी 30 लाख 45 हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment