अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.
तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही. त्यामुळे शहरास उतरती कळा लागली.

या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. आमदार झाल्यानंतर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवन देईन, छिंदम याने जगताप, राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
- पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात उठवला आवाज
- नगर- जामखेड महामार्गावर पोलिसांकडून बनावट कारवायांचा धडाका
- अहिल्यानगर शहरात सुख,समृद्धी नांदू दे, सर्वांचे संकटे दूर होऊ दे, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची पांडुरंगाचरणी प्राथर्ना
- आमच्या गावात लिंबू खरेदी करायचे नाहीत असे म्हणत श्रीगोंद्यात व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण
- जामखेड तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड सागर मोहोळकरची पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी