31 कोटी संपत्ती असणाऱ्या विखेंकडे नाही एकही चारचाकी !

Published on -

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे 31 कोटी एवढी संपत्ती असून ते या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.

भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जंगम संपत्ती चार कोटी 69 लाख 762 रुपये, स्थावर संपत्ती 51 लाख 13 हजार 200 रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख 49 हजार 789 रुपये, बँक खाती दोन कोटी 37 लाख 27 हजार 856 रुपये,

शेअर्स बंदपत्रे यात एक कोटी 74 लाख 954 रुपये, पोस्ट खात्यात 26 लाख 65 हजार 731 रुपये. त्यांच्याकडे 550 ग्रॅम सोने चांदी असून त्याची किंमत 20 लाख 13 हजार रुपये, अन्य मालमत्ता 6 लाख 24 हजार 362 रुपये आहे.

त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे वाहन नसून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांच्या नावे पाच कोटी 14 लाख 98 हजार 969 रुपये आहे.

त्यांच्याकडे 1150 ग्रॅम सोने-चांदी असून त्याची रक्कम 42 लाख 57 हजार 400 रुपये आहे. त्यांच्याकडे दोन कोटी 42 लाख 79 हजार 107 रुपये बँक खाती असून रोख रक्कम 67 हजार 91 रुपये आहे. शेअर्स एक कोटी 10 लाख 52 हजार 31 रुपये एवढी संपत्ती आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!