सोलापूर दि. 6 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला.
त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,
पी. शिव शंकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,
वैंशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, ‘कोरोना विषाणूचा सामना केवळ वैद्यकीय आघाडीवर करुन चालणार नाही. त्यासाठी सर्व विभागांत जास्तीत जास्त सूसूत्रता असायला हवी.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आणि यामध्ये कार्यरत असणारे सर्व विभाग यामध्ये समन्वय असायला हवा’.
सोलापुरात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधेमुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. येथून पुढे मृत्यू न होण्यासाठी उपचाराच्या स्टॅंडर्ड प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी करा.
अतिदक्षता विभागांतील रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा. त्याचबरोबर मरण पावलेल्या व्यक्तींच्या आरोग्य विषयक संदर्भाचे विश्लेषण करा. त्यानुसार उपचारात काही सुधारणा करता येणे शक्य आहे का ते तपासून घ्या, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील, किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, पोलीस उपायुक्त बापू बांगर,
क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. सागर गायकवाड, डॉ. मंजिरी कुलकर्णी , डॉ. राजेश चौगले आदी उपस्थित होते.
त्यांनतर विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या सोलापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रास (कंटेंनमेंट झोन) भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे आदी अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागास दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे.