आमदार बाळासाहेब मुरकुटेंना धक्का, गडाख-घुलेंचे झाले मनोमिलन !

Ahmednagarlive24
Published:

नेवासा :- राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी गडाख व घुले यांचे मनोमिलन होईल का? या राजकीय शंकेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

आज सकाळी क्रांतिकारीचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी भेंडा येथे त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली .

मागील निवडणुकीतील घुले बंधूंच्या भूमिकेवरून गडाख नाराज होते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्यावेळी बाहेर पडून त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षातून निवडणूक लढवून यश मिळवले.

तेव्हापासून घुले बंधू व गडाख यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु होते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी नेवाशात उमेदवार न देता शंकरराव गडाखांना पाठिंबा दिला.

गडाख बंधूंनी भेंड्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी श्री. नवले यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुलेही उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment