राज्यात कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि.७: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १७ हजार ९७४ झाली आहे. आज  १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज  २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत –

●        या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत.

●        ३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर

●        ४२४ ( ५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ ( ३ टक्के)  रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे.

उर्वरित ९६ रुग्ण  इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

आज राज्यात ४३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २,

अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि  औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.  याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५  रुग्ण आहेत तर १४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४  झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ११ हजार ३९४ (४३७)

ठाणे: ९३ (२)

ठाणे मनपा: ६५० (८)

नवी मुंबई मनपा: ६५९ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)

उल्हासनगर मनपा: १४

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: १८९ (२)

पालघर: ४६ (१)

वसई विरार मनपा: १८७ (९)

रायगड: ७६ (१)

पनवेल मनपा: १२५ (२)

ठाणे मंडळ एकूण: १३,७१७ (४७२)

नाशिक: ४७

नाशिक मनपा: ५४

मालेगाव मनपा:  ४३२ (१२)

अहमदनगर: ४४ (२)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ६४ (११)

जळगाव मनपा: १४ (२)

नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ७१५ (३१)

पुणे: १०५ (४)

पुणे मनपा: १८९९ (१२२)

पिंपरी चिंचवड मनपा: १२५ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: १७७ (१०)

सातारा: ९४ (२)

पुणे मंडळ एकूण: २४०६ (१४१)

कोल्हापूर: १० (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)

सिंधुदुर्ग: ४ (१)

रत्नागिरी: १६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (३)

औरंगाबाद:३

औरंगाबाद मनपा: ३९७ (१२)

जालना: ८

हिंगोली: ५८

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४६८ (१३)

लातूर: २५ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २९ (२)

लातूर मंडळ एकूण: ६१ (३)

अकोला: ९ (१)

अकोला मनपा: ९० (९)

अमरावती: ४ (१)

अमरावती मनपा: ६९ (९)

यवतमाळ: ९३

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: २९० (२१)

नागपूर: २

नागपूर मनपा: २०४ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २१२ (२)

इतर राज्ये: ३४ (८)

एकूण:  १७ हजार ९७४ (६९४)

( टीप – आय सी एम आर पोर्टलवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज रोजी दाखविण्यात आलेल्या नवीन ८२६ रुग्णांपैकी १४६ रुग्णांचा समावेश रिकांन्सेलेशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

(ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड १९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १३६२०२३ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे.

प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

यापूर्वी कळविण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मृत्यू मुंबई मनपा क्षेत्रातील असल्याने तो आज  मुंबईमध्ये दर्शविण्यात आला आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात सध्या १०८७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार २१ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५१.७६  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment