साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली ?

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची माहिती काढायची, कोर्टात याचिका दाखल करायची आणि स्वार्थासाठी आर्थिक तडजोड करुन नेतेगिरी करणाऱ्याला कायमचे घरी बसवा, असे आवाहन तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी मंगळवारी केले.

काष्टी येथे भाजपचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विठ्ठलराव काकडे, सदाशिव पाचपुते, विजय भोईटे, बापूसाहेब हिरडे, काका रोडे, गणपतराव परकाळे, कुंडलिकराव भोसले, विठ्ठल गुंड, सुनील मगर, शांतिलाल खरात, आबासाहेब कोल्हटकर, सर्जेराव रंधवे, दत्तात्रय गायकवाड, नेमचंद बाबर, सुदाम पवार यावेळी उपस्थित होते.

भगवानराव पाचपुते म्हणाले, खरा विकास करणारा माणूस कोण आहे याचा विचार करा. पाच वर्षे सत्ता देऊन शेतीचे वाटोळे करणाऱ्याला नियतीने घरी बसवले. सत्तेवर असताना पाण्याचे नियोजन करता आले नाही.

साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली, याचा मतदारांनी विचार करावा. निवडणूक आली की, आर्थिक तडजोडी करुन राजकारण करणाऱ्यांची दुकानदारी बंद करा, असे म्हणत त्यांनी घनश्याम शेलार व आमदार जगताप यांचा चांगलाच समाचार घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment