अनिल राठोडांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची तोफ नगर मध्ये  धडाडणार!

Published on -

अहमदनगर :- शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार व माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ अहमदनगर मध्ये आज (बुधवारी) संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची सभा नंदनवन लॉन्स येथे होणार आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नगर मध्ये तोफ धडाडणार असून उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणता संदेश देणार याकडे लक्ष लागले आहे. या सभेत ठाकरे काय बोलतात याची नगर वासियांना उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच विविध पक्षांतर्फे जाहीर सभांचा धडाका सुरु होणार आहे. नगर शहरात सर्वात पहिल्यांदा अनिल राठोड यांनी बाजी मारली असून आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सभेची जय्यत तयारी झाली असून टिळक रोड परिसरातील वातावरण भगवेमय झाले आहे. या जाहीर सभेतून उपनेते आणि; राठोड यांच्या विजयाचा संकल्प सोडला जाणार आहे. 

नगर शहरात त्यांची पहिली सभा होणार असून,या पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी जागेची पाहणी केली.

या वेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, श्याम नळकांडे, भगवान फुलसौंदर, परेश लोखंडे, अनिल शिंदे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, सचिन शिंदे, काका शेळके, प्रशांत गायकवाड अमोल येवले आदी उपस्थित होते.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe