पारनेर :- मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस – कॉग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (८ ऑक्टोबर) पारनेर येथे आले होते. पारनेरमधील सभा संपल्यानंतर जळगावला उड्डाण घेण्याण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले.
बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने दुसरे हेलिकॉप्टर पारनेर येथील हेलिपॅडवर मागविण्यात आले. त्यानंतर पवार दुसऱ्या हेलिकॉप्टरने जळगाव येथे सभेसाठी रवाना झाले.

या दरम्यान, तब्बल दीड तास पवार यांना पारनेर येथे थांबावे लागले. बिघाड झालेले हेलिकॉप्टर पारनेर येथील हेलिपॅडवर असून, त्याला पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे पारनेरला आले होते. दुपारी २ च्या सुमारास सभा संपल्यानंतर जेवण करून पवार जळगावकडे रवाना होणार होते.
दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकत नसल्याचं पायलटने राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी व पोलिस प्रशासनाला सांगितले.
त्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून दुसरे हेलिकॉप्टर पारनेरला मागवून घेतले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास शरद पवार जळगाव येथील सभेसाठी रवाना झाले.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













