मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या वर्षीचा मातृदिन अंगणवाडी सेविकांना समर्पित केला आहे. त्यासाठी त्यांनी एक अभंगपर कविता रचली आहे.

कोरोना परिस्थितीमध्ये महिला व बालविकास विभाग लहान बालके, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पोषण आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करत आहे.

राज्यातील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सुमारे 57 लाख 10 हजार बालके आणि 11 लाख 26 हजार गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरी योजनेतील किशोरवयीन मुलींपर्यंत पूरक पोषण आहार (टेक होम रेशन) घरपोच वितरित करण्यात आला आहे.

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही बालके व महिलांच्या पोषणावर विपरीत परिणाम झाला नाही. हे अंगणवाडी सेविकांच्या मेहनतीचे यश आहे.

हे सर्व काम आरोग्यविषयक आवश्यक ती दक्षता घेत तसेच योग्य सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टंसिंग) राखत केले जात आहे.

एकूणच महिला व बालविकास विभाग राज्यातील बालके आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपत्ती कालावधीतदेखील उत्कृष्टरित्या काम करत आहे.

ॲड. ठाकूर यांनी केलेली कविता –

माझ्या अंगणवाडी सेविकांनो, कामे करता तुम्ही।

त्याने प्रसन्न होई माय, प्रसन्न होई मायभूमी।।

माय सांगे लेकरा, नका जाऊ बाहेरा।

ऐका आईचे जरा, ठेवा करोना दूरा ।।

मातेचा मायेचा हात, प्रेमाचा मोठा स्त्रोत।

वारंवार धुवा हात, करू करोना वरी मात।।

आई धरे पोरा अंतरी, उभे रहा योग्य अंतरी।

संदेश हा यशोमतीचा, महिला बाल कल्याणाचा।।

करुया माय वंदना, करुया दूर करोना।

करुया माय वंदना, करुया दूर करोना।।

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment