राहुरी :- दोन दिवसांत भाजपच्या यादीत माझे नाव दिसेल. ३ सप्टेंबरला आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या माझ्या उमेदवारीबाबतच्या उलटसुलट वृत्तात दम नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी सांगितले.
राहुरी येथील मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे होते. कर्डिले म्हणाले, मागील पाच वर्षांत राहुरी मतदारसंघातील २०० कोटींच्या पुढे विकासकामे मार्गी लावली.

लोकांच्या सुख-दु:खात मी रात्रंदिवस सहभागी आहे. तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणे गैर नाही. विकासकामात आपण कुठेही मागे पडलो नसल्याने पक्षाकडून डावलण्याचा संबंध येतो कुठे? असे आमदार कर्डिले म्हणाले.
विकास मंडळाचे अध्यक्ष तनपुरे, मुळा-प्रवराचे संचालक शिवाजी सागर, गोपाळ आगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय डौले, शिवाजी सोनवणे, उत्तम म्हसे, शिवाजी गाडे, अण्णा शेटे, शहाजी जाधव, ज्ञानेश्वर पोपळघट, सोन्याबापू जगधने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्डिले यांची उमेदवारी कधी जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Mahindra XUV 3XO खरेदीसाठी 200000 डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- Tata Motors चा मोठा धमाका ! नव्यानेच लॉन्च झालेल्या SUV च्या किमतीत 1.80 लाखांची कपात, वाचा डिटेल्स
- ‘हे’ आहेत 10 वर्षात करोडपती बनवणारे टॉप 5 Mutual Fund ! 3 वर्षात पैसे झालेत दुप्पट
- Creta ला टक्कर देणारी ‘ही’ SUV 1.32 लाख रुपयांनी स्वस्त! कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर?
- ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना देतोय 10 Bonus Share ! रेकॉर्ड डेट पण झाली फायनल