महायुती सरकारचा पराभव अटळ,भावी मुख्यमंत्री आघाडीचाच – बाळासाहेब थोरात !

Published on -

संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe