आ.संग्राम जगताप यांच्या अडचणीत भर, वंचितकडून किरण काळे यांना उमेदवारी !

Published on -

अहमदनगर :- आज वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नगर शहर विधानसभा मतदारसंघातून किरण काळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून काळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी त्रासदायक ठरणारी आहे.किरण काळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe