शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात,राष्ट्रवादीला धक्का !

Published on -

अहमदनगर :- शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इछुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत.

अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली.

या बैठकीला शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम हेही या बैठकीला हजर राहिले.

बैठक संपल्यानंतर अनिल राठोड व जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे शिवालयात गेले असता, त्याठिकाणी अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी येऊन राठोड यांची भेट घेतली व शिवसेनेत सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.

दरम्यान शिवसेनेकडून महापौरपद देण्यात न आल्याने अंबादास पंधाडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. तर, मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत राजेंद्र राठोड यांनी शिवसेनेचे शिवबंधन तोडत हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले होते.

पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असलेले अंबादास पंधाडे व राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावत पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe