अहमदनगर चे राजकारण : बाप शिवसेनेत मुलगा राष्ट्रवादीत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – थंडगार पडलेली शिवसेनेची बुलंद तोफ अंबादास पंधाडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अनिल राठोड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच पंधाडे त्यांच्या भेटीसाठी शिवालयात पोहोचले.

पंधाडे यांचा मुलगा सारंग हे मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे खास कार्यकर्ते आहेत. नगरच्या राजकारणात ‘बाप इकडं आणि बेटा तिकडं’ असं चित्र यानिमित्ताने दिसून आलं. बाप इकडं बेटा तिकडं लहानपणापासूनच रक्तात भिनलेले हिंदुत्व घेऊन अंबादास पंधाडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.

नगरसेवकपदापुरतीच धाव असलेले पंधाडे यांची बुलंद तोफ गेल्या ५ वर्षांपासून थंडावली होती. याचदरम्यान त्यांचा मुलगा सारंग हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले . अंबादास पंधाडे यांनी राजकीय विजनवास घेतला तरी शिवसेना मात्र सोडली नव्हती. तात्विक मतभेदांमुळे ते राठोडापासून दुरावले होते.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment