अनिल राठोड यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला येणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेत प्रवेशाबद्दलच्या काही अफवा होत्या, पण त्यात काहीच तथ्य नव्हते, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म आणल्यानंतर उपनेते राठोड यांचे केडगावकरांनी रंगोली चौकात स्वागत केले.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, अंगत महानोर, नगरसेवक आमोल येवले, विजय पठारे, सुनील सातपुते, आबा सातपुते,पप्पू ठुबे, योगीराज गाडे, संजय कोतकर,संग्राम शेळके, पप्पू भाले, भाकरे महाराज, संजय लोंढे, मुकेश जोशी, सोनू खान, अमोल वाळके,अविनाश मेहेर, अविनाश वाळके, विठ्ठल कोतकर सह नागरिक उपस्थित होते.

नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या अफवांचे पिक सोशल मिडियावर जोमात वाढले होते. पण राठोड यांच्या उमेदवारीमुळे या अफवांचा विषय संपलेला आहे. ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, अप्पा दातरंगेही आता शिवसेनेत सक्रीय झाले आहेत.

शिवसेनेने शहर मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली असून प्रचारही सुरू झाला आहे. सत्तेत आल्यानंतर राठोड यांच्या रूपाने शहरात कॅबिनेट मंत्री पद मिळवण्याची संधी आहे. निवडणूक कालावधीत स्टार प्रचारकांची फौजही नगर शहरात येणार असल्याचे संकेत पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून दिले जात आहे. दोन दिवसात पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दिलीप सातपुते म्हणाले, नगर शहराला अनिल राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे. शहरात बदल आणि विकास शिवसेनाच करणार हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी या पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या त्याही बंद होतील, असे यावेळी बोलताना सांगितले.

नगर शहरात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन आहे. युवा नेते आदित्य ठाकरे, उपनेते आदेश बांदेकर, नितीन बानगुडे या स्टार प्रचारकांची नावे समोर आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment