नेवासे :- भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच नेवासे तालुक्यातील अनेक गावांत भाजप, सेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
मुरकुटे यांनी फेरी काढत देवदर्शन घेतले. भाजपची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित, अशी परिस्थिती असताना नेवासे तालुक्यात संदिग्ध वातावरण होते.

आमदार मुरकुटे यांना नाकारत भाजपचे तिकीट बदलले जाणार, नेवासे मतदारसंघ शिवसेनेला सोडणार अशा बातम्यांनी भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांत, तसेच मतदारांमध्येही संभ्रम निर्माण केला होता.
तथापि, आमदार मुरकुटे हे उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत होते. मंगळवारी भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार मुरकुटे यांनी नेवासे तालुक्याचे दैवत असलेल्या देवगडच्या दत्तात्रेयांचे दर्शन घेतले, तसेच शनिशिंगणापूरला जाऊन अभिषेक केला. त्यानंतर नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरातील पैसचे, ग्रामदैवत मोहिनीराज व बेलपिंपळगावच्या जागृत मारूतीचे दर्शन घेतले.
- सापांची भीती वाटते ? मग घरात ही वस्तू अवश्य ठेवा, साप दिसला की शिंपडा, 100% साप पळून जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुम्हालाही योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु
- लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार ! 12,500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार 40,00,000 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत आजच गुंतवणूक करा
- Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दर महिन्याला मिळणार फिक्स व्याज