श्रीगोंद्याचे राजकारण धक्कादायक वळणावर !

Published on -

श्रीगोंदा :- भाजपने पहिल्याच यादीत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करताच श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे.

कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे भाजप प्रवेश करणार आहेत. आज दुपारी नागवडे दाम्पत्य भाजपात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप निवडणूक लढविणार नसून अण्णासाहेब शेलार किंवा घन:श्‍याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

आमदार राहुल जगताप हे भाजपाच्या कायम संपर्कात राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवारीसाठी त्यांना अडचणी आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe