संगमनेर :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘पालकमंत्री साहेब, त्यांच्या सभेला (विरोधी उमेदवाराच्या) जाणाऱ्या लोकांची यादी काढा.
त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?

तुम्हाला कमळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरिबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’ असे विखे म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे.
विखेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील काही तरुणांनीही एकत्र येऊन विखे यांना दोन हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाने पाठवला आहे.
‘कमळाला मत देणार नसाल, तर दोन हजार रुपये परत करा,’ अशा प्रकारचे विधान करून राज्यातील शेतकऱ्यांच्या मताची किंमत करीत विखे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचेही या मुलांनी म्हटले आहे.
‘दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील, ज्यांच्यासाठी सुजय नैतिकता बाजूला ठेवून मतांचा जोगवा मागत आहेत ते राम शिंदे व त्यांच्या पक्षाला, म्हणजेच भाजपला मतदान करू नका,’ असे आवाहनही या तरुणांनी शेतकऱ्यांना केले आहे.
- AC कोचमधून बेडशीट, उशी किंवा टॉवेल चोरी गेल्यास कोण असते जबाबदार?, रेल्वेचे नियम काय आहेत? जाणून घ्या
- ‘हे’ आहेत जगातील सर्वात सुंदर 6 रंगीबेरंगी आणि हुशार प्राणी, फोटो पाहूनच थक्क व्हाल!
- मालदीवसाठी बजेट प्लॅन करताय? फक्त ₹1000 रुपयांमध्ये काय काय करता येतं, जाणून घ्या!
- भारतात ‘या’ 5 कर्करोगाने वाढवली चिंता, पुरुषांसाठी शेवटचा प्रकार ठरतोय जीवघेणा!
- क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे फक्त 5 फलंदाज, यादीत धोनी-सचिनचे नावच नाही!