औरंगाबाद :- मराठवाड्यातील जालना येथील रश्मी देशपांडे या तरुणीने अटकेपार झेंडा फडकवला आहे. फेसबुकने तब्बल तिला ८० लाख रुपयांचे पॅकेज, शिवाय कंपनीचे २१ लाखांचे शेअर्सही दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ती आयर्लंड येथे फेसबुकच्या कार्यालयात रुजू होणारआहे.
३१ वर्षीय रश्मीने जालन्याच्या नवयुवक गणेश विद्यालय, श्री. म. स्था. जैन विद्यालयातून दहावी तर जेईएस महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठात बी. ई. पदवी मिळवली. स्वीडन, फिनलँड, फ्रान्स आणि अमेरिकन कंपन्यांमध्ये काही काळासाठी नोकरी केली.

जुलै महिन्यात फेसबुकने भारतातून उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली. देशभरातून हजारो तरुणांनी यामध्ये भाग घेतला होता. या निवडीच्या ५ तांत्रिक तर २ अतांत्रिक फेऱ्या झाल्या. शेवटी व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची फेरीही झाली.
प्रत्येक फेरीत रश्मी आघाडीवर राहिली. देशभरातून निवड होणारी ती एकमेव तरुणी आहे. आयर्लंड येथील निवासाची व्यवस्थाही फेसबुक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्या निवडीने मराठवाड्याची खासकरून जालन्याची शान वाढली आहे.
- पुणे, अहिल्यानगर, नागपूरकरांसाठी Good News! रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ स्थानकावर थांबा
- भारतीय सैन्यातील अग्नीवीरांना किती पगार मिळतो ? पहिल्या वर्षापासून ते चौथ्या वर्षापर्यंतच्या पगाराचे स्ट्रक्चर पहा
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…