नगर :- शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. कसले गुंड, कोण गुंड? या गुंडांची तुमच्या पायाशी उभे राहण्याचीही लायकी नाही. एका बाजूला आपले अनिल राठोड व दुसऱ्या बाजूला जो गुंड असेल त्याने याद राखावे, यापुढे गुंडागर्दी केली, तर बोलून दाखवणार नाही, करून दाखवेन, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचे नाव न घेता दिला.
शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे भाऊ कोरगावकर, खासदार सुजय विखे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिला शिंदे, सुरेखा कदम, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी मी खासदार सुजय विखेंबद्दल ऐकले होते, आज अनुभवयास मिळाले. अभिषेक कळमकर यांनी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला. हे कुटुंब तुम्हाला जपून पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. राठोड यांच्या वचननाम्यातील गुंडागर्दीबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही.
या गुंडाची तुमच्या जोड्यापाशी उभे राहण्याची लायकी नाही. असे नगरचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणार का? अनिलभय्या जिंकले किंवा हरले हा प्रश्न नाही. हा प्रश्न नगरकरांच्या अब्रूचा आहे. एका बाजूला राठोड, तर दुसऱ्या बाजूला जो कोणी गुंड असेल त्याने यापुढे गुंडागर्दी केली तर याद राखावे.
पुढचे बोलत नाही, मी करून दाखवेन. शिवसैनिकांची हत्या झाली होती, त्यावेळी आलो होतो. ही हत्या मी विसरू शकणार नाही. मी सुडाने वागत नाही, ती आमची शिकवणही नाही, पण अन्याय करणार नाही अन् सहनही करणार नाही. अन्याय केला, तर कोणीही असला, तरी त्याला तोडूनमोडून टाकेन, असा ते ठाकरे शैलीत म्हणाले.
- वांबोरी चारी टप्पा एकच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून १४ कोटींचा निधी मंजूर, ४३ गावातील शेतकऱ्यांना होणार फायदा
- भंडारदरा येथील रंधा धबधब्याच्या पाण्यात उडी घेत तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी, कृती टाळण्याचे पोलिसांकडून आवाहन
- Pune-Nashik Expressway : पुणे ते नाशिक फक्त ३ तासांत! सरकारचा २८,००० कोटींचा धडाकेबाज महामार्ग प्रकल्प
- आधार अपडेटसाठी नवे नियम लागू! आता नाव, फोटो, पत्ता बदलण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे
- सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मागे पडला, भारताच्या ‘या’ नवख्या खेळाडूने कसोटीत केला अनोखा विक्रम!