पाच वर्षांत नगर शहराचा बिहार झाला….

Published on -

अहमदनगर :- गेल्या  ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.  

नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा स्थायी होणे आवश्यक आहे. तो शिवसेनेने केला शहरात एक नाही, तर तीन उड्डाणपुलांची गरज आहे. 

 आता जनताच लोकप्रतिनिधी होणार आहे. २५ वर्षांचा सुवर्णकाळ होता. हा काळ पाच वर्षे झाकोळला गेला होता, म्हणून हे वैभव पुन्हा उभे करायचे आहे. शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन दिले आहे.” असे त्यांनी बोलताना सांगितले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe