धुळे : निवडणूक सुरु झाली आहे, काही दिवसांवर मतदान आले आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाही. कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहेलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहेलवानच दिसत नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेते पहिल्यापासूनच पराजयाच्या मानसिकतेने खचले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. धुळे ग्रामीणमधील नेर येथे ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात त्यांनी जगातली सर्व आश्वासने देऊन टाकली. फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासन देणे बाकी राहिले आहे. पन्नास वर्षे खोटे बोल पण रेटून बोल अशा प्रकारचे त्यांनी राजकारण केले. जनतेचा नव्हे तर स्वतःचा फायदा करुन घेतला. गेल्या पाच वर्षात हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही चोवीस तास जनतेकरीता काम केले. जनतेचा पैसा जनतेकडे नेला.
- एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद