मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून अनेक तरुण मैदानात उतरले आहेत. या युवा नेत्यांना जनतेकडून काय प्रतिसाद मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, राज्याच्या राजकारणात अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेत्यांची गरज आहे.
अशावेळी अनेक युवा नेते आपले नशिब आजमावत आहेत. आजची युवा नेते तंत्रस्नेही असल्याने त्यांचा वावर सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांची युवा वर्गात मोठी चर्चा होताना दिसते. त्याचमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठांची मक्तेदारी मोडीत काढत तरुणतुर्क नेत्यांनी विधानसभेच्या रणांगणात आपला शड्डू ठोकला आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, काँग्रेसचे धीरज देशमुख, कोल्हापूरमधील काँग्रेसचे ऋतूराज पाटील, सांगोल्यातील डॉ. अनिकेत देशमुख, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, बीडमधून संदीप क्षीरसागर, मुक्ताईनगरमधून रोहिनी खडसे, भाजपचे राम सातपुते आदी युवा मंडळी पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या